'मला साठ हजार रुपये द्या, माझं बाळ तुम्हाला विकते' 

'मला साठ हजार रुपये द्या, माझं बाळ तुम्हाला विकते' 
Updated on

मुंबई - पैशांसाठी कोण काय करेल याचा काहीच नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना घडलीये नवी मुंबईत. बातमी वाचून तुम्ही सुन्न व्हाल. एका बारबालेने चक्क अडीच महिन्यांचं उत्तर प्रदेशातून पळवून आणलेलं बाळ विकण्याचा कट रचला होता. मात्र सतर्क पोलिसांमुळे हा कट हाणून पाडण्यात आलाय. या बारबालेने नवी मुंबईतील एका जोडप्याला ती प्रेग्नन्ट आहे असं भासवलं आणि डिलेव्हरी नंतर हे बाळ तुम्हाला देईन, असा या बारबालेचा प्लॅन होता. यासाठी तिने चक्क त्या जोडप्याकडे हॉस्पिटलचे ६० हजार तुम्ही भरा आणि मी तुम्हाला बाळ देते असं सांगितलं होतं.  दरम्यान या बारबालेचा पळवून आणलेल्या बाळाला विकण्याचा डाव पोलिसांनी हणून पडलाय.  

आपल्या आसपास असे अनेक जोडपे असतात ज्यांना लग्न होऊन अनेक वर्ष संतानप्राप्ती होत नाही. अशात वैज्ञानिक अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामार्फत संतानप्राप्ती होऊ शकते. काहीच पर्याय नसेल तर बाळ दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळतंय. अशात काही अशाही केसेस समोर येतात ज्यामध्ये जोडपी वेगळा पर्याय निवडतात. नवी मुंबईतही असंच झालं. नवी मुंबईतील एका जोडप्याला लग्न होऊन अनेक वर्ष झालीत. अशात त्यांना संतानप्राप्ती होत नव्हती. या दरम्यान त्यांचा एक बारबालेशी संपर्क झाला.  या बारबालेने या जोडप्याला आपण प्रेग्नन्ट आहोत असं सांगितलं आणि या जोडप्याकडून पैसे उकळले गेलेत. त्यानंतर ही बारबाला आगऱ्याला गेली आणि तिथून तिने अडीच महिन्याचं बाळ पळवून आणलं. पण हॉस्पिटलचे साठ हजार रुपये भरा आणि त्यानंतर तुम्हाला बाळ देईन असं ही बारबाला सांगत होती.      

उत्तर प्रदेशातील आगऱ्यामध्ये पोलिसांकडे 'बाळ चोरी' प्रकरणी FIR नोंदवली गेली होती. यासाठी पोलिसांनी एका विशेष पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने शोधकार्य राबवत ते थेट नवी मुंबईत येऊन पोहोचलेत आणि त्यांनी APMC पोलिसांच्या मदतीने या बारबालेला ताब्यात घेतलंय. 

pay hospital bill of worth sixty thousand and i will handover my baby police  arrested women 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.